गोल पोस्ट स्पॉटलाइट नवीन वर्ष येण्याआधी सिद्धार्थ आणि कियारा चढणार बोहल्यावर ?

नवीन वर्ष येण्याआधी सिद्धार्थ आणि कियारा चढणार बोहल्यावर ?

पुणे ,३ नोव्हेंबर २०२२ : बॉलीवूड स्टार त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्या बद्दलही कायम चर्चेत असतात. सध्या बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीची बरीच चर्चा होती. हे दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत.

‘शेरशहा’ रिलीज झाल्यानंतर या लव्हबर्ड्स जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. त्यांची जोडी ही प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार हे दोघे डिसेंबर मध्ये लग्न करणार आहेत. या दोघांनी डिसेंबरमधील एक तारीख सुद्धा लॉक केल्याचे म्हणण्यात येत आहे.

आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी चंदिगडमध्ये लग्न करू शकतात. त्यानंतर दिल्लीत मोठ रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. नंतर ही जोडी मुंबईतील मित्रपरिवारासाठी मुंबईतही रिसेप्शन आयोजित करणार असल्याचं कळतंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version