नवी दिल्ली, 16 ऑक्टोंबर 2021: 35 वर्षीय दलित तरुण लखबीर सिंह यांची सिंघू सीमेवर हत्या आणि नंतर मृतदेहासह विटंबना केल्याचं प्रकरण वाढत आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे, ज्यामध्ये सिंघू सीमा रिकामी करण्याची मागणी करण्यात आलीय. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम यूपीचे शेतकरी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षीपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. यापैकी एक आहे सीमा सिंघू, जिथं शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह बॅरिकेडवर लटकलेला आढळला.
लखबीर सिंह हत्या प्रकरणात वकील शशांक शेखर झा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यासह, याचिकेत वकिलांनी सिंघू सीमा देखील लवकर रिकामी करावी अशी मागणी केली आहे. दलित व्यक्ती लखबीर सिंगचा मृतदेह शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठाजवळून सापडला आहे. मृतक पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याला तीन मुली देखील आहेत, जो त्यांच्या आईसोबत राहतो.
SC ने यापूर्वीही फटकारलं
शेतकरी आंदोलनाशी संबंधित विविध मुद्दे सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा सुनावणीस आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीच्या शेतकऱ्यांशी संबंधित ‘किसान महापंचायत’ नावाच्या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कठोरपणे फटकारलं होतं. कोर्टाने सांगितलं की तुम्ही गाड्या थांबवत आहात, महामार्ग बंद करत आहात. शहरी लोकांनी त्यांचा व्यवसाय बंद करावा का? शहरातील तुमच्या धरणेमुळं हे लोक आनंदी होतील का? सर्वोच्च न्यायालयाने पुढं म्हटलं की तुम्ही संपूर्ण शहर ब्लॉक केलंय आणि आता तुम्हाला शहरात येऊन निषेध करायचा आहे. तुम्ही कृषी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचलात, याचा अर्थ तुमचा न्यायालयावर विश्वास आहे. मग निषेधाची गरज काय?
निहंगने आत्मसमर्पण केले, मारल्याचा दावा केला
या प्रकरणात एका निहंगने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. निहंग सर्वजीत सिंगने हा खून केल्याचा दावा केला. पोलिस शनिवारी निहंगला न्यायालयात हजर करणार असून, त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. याशिवाय, निहंग गट निरवेर खालसा-उदना दल यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. निहांग गटाने कॅमेऱ्यासमोर एका व्हिडिओमध्ये कबूल केले की त्यांच्या गटातील निहंगांनी लखबीरला ठार मारलं. गटाचे पंथ-अकाली बलविंदर सिंह यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, ही घटना रात्री 3 वाजता उशिरा घडली. त्याने धार्मिक ग्रंथाची विटंबना केली होती, त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे