टीम इंडिया सेमीफायनल तरी गाठणार का ? कपिल देव यांचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२ : १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. या वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असू शकते याबाबत अनेक माजी क्रिकेटर आपली मते मांडत आहेत. सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, आकाश चोपडा, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, या खेळाडूंना टीम इंडियाकडे विश्वचषक जिंकण्याची ताकद असल्याचं म्हटलंय.

काही माजी क्रिकेटर यांच्या मते भारतीय टीम वर्ल्डकप विजेतेपदाची प्रबल दावेदार आहे. पण भारताचे माजी वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांना मात्र असं वाटत नाही. त्यांच्या मते टीम इंडिया सुपरफोर मध्ये जाण्याची शक्यता फक्त ३० टक्के इतकीच आहे. या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

त्यांनी एक इंटरव्यू मध्ये बोलताना असं म्हटले की या वर्षीचा टी ट्वेंटी विश्वकप भारताला जिंकणं खूप अवघड आहे. इतकंच काय तर भारतीय संघ टॉप फोर मध्ये ही जागा मिळवेल की नाही याबाबत खात्री देऊ शकत नाही. त्यांच्या मते हार्दिक पांड्यावर बरच काही अवलंबून असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा