उदगीर येथील बंद पडलेली शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू होणार? राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने केली पाहणी

उदगीर, लातूर १८ डिसेंबर २०२३ : लातूरच्या उदगीर येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू करण्यासाठी डेअरी समितीच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या पथकाने या बंद अवस्थेतील दूध डेअरीची पाहणी केली आहे.

या सर्वेक्षणाचा अहवाल लवकरच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला सादर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) पथकाने यापूर्वीच या डेअरी प्लांटला अपग्रेड करण्याची शिफारस केली आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे मुकेशकुमार झा, प्रदीप चव्हाण, महेश पाटील, गणेश बरुरे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : महादेव रोडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा