Windows-XP च्या वॉलपेपरची कथा

मुंबई : संगणकाच्या Windows-XP या प्रणालीतील डिफॉल्ट वॉलपेपर माहित नाही असा व्यक्ती दुर्मिळच सापडेल. आकाश आणि हरित टेकडी या स्वरूपाचा हा वॉलपेपर अजूनही चर्चेत आहे. जाणून घेऊ या यामागची कथा.

या वॉलपेपरसाठी वापरला गेलेला फोटो हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहे. चार्ल्स नावाच्या फोटोग्राफरने तो काढलेला आहे.
चार्ल्स एकदा आपल्या गर्लफ्रेंडसोबत कारमधून फिरत असताना अचानक वादळ आल्यामुळे त्यांना थांबावे लागले. वादळ थांबल्यावर सोनोमा हायवेवरून जाताना चार्ल्स यांचे लक्ष एका डोंगरावर गेले जिथे नयनरम्य दृश्य होते.
चार्ल्स यांना या दृश्याने मोहून टाकले आणि त्यांनी थोड्या -थोड्या अंतरावरून त्या निसर्गरम्य दृश्याचे ४ फोटो काढले. चार्ल्स त्यावेळी नॅशनल जिओ ग्राफिक चॅनेलला काम करत होते. परंतु या चॅनेलला सदरील फोटोंचा काही उपयोग होणार नव्हता.
नंतर चार्ल्स यांनी हा फोटो स्टॉक वेबसाईट कार्बिजवर टाकला. येथे पैसे देऊन फोटोचा वापर करता येतो. नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीने हा फोटो खरेदी करण्यासाठी चार्ल्स यांच्याशी संपर्क केला. मायक्रोसॉफ्टने चार्ल्स यांना विमानाचे तिकीट पाठवले व सदरील फोटो मूळ कॉपीसह त्यांच्याकडून खरेदी केला.
दरम्यान, चॉर्ल्स यांच्याकडून मायक्रोसॉफ्टने गोपनीयता करारावर स्वाक्षऱ्या करून घेतल्यामुळे हा फोटो किती किंमतीला विकला गेला. याचा मात्र खुलासा होऊ शकला नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा