भारत हमला करेल या भीतीने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले, पाकिस्तानच्या संसदेत खुलासा

इस्लामाबाद, २९ ऑक्टोबर २०२०: भारताच्या कारवाईवरून पाकिस्तान मध्ये किती भीतीचे वातावरण आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. ताज्या उदाहरणानुसार पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी असे म्हटले आहे की भारताचे पकडलेल्या फायटर जेट पायलट अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या कारवाईच्या भीतीपोटी सोडण्यात आलं होतं.

पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी असा खुलासा केला की, “मागच्या वर्षी पकडण्यात आलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने बंदिस्त केले होते. मात्र, त्यांना सोडण्यासाठी भारताकडून कारवाई करण्यात येणार होती आणि ही कारवाई टाळण्यासाठीच भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडले होते. भारताला खुश करण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडावे लागले होते.”

त्याचवेळी पाकिस्तान विधानसभेचे माजी सभापती अयाज सादिक म्हणाले की, “त्यावेळी पाकिस्तानला अशी भीती होती की विंग कमांडर अभिनंदन यांना सोडवण्यासाठी भारत कोणत्याही क्षणी हमला करू शकतो. भारत हमला करण्याच्या आशंकेने त्यावेळेसचे सेना प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते. चेहऱ्यावर घाम आला होता. भारत आपल्या वर हमला करेल की काय या चिंतेने ते घाबरले होते.”

अयाज सादिक म्हणाले, “परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी थरथरत होते. अभिनंदन संदर्भात ते म्हणत होते की आपल्या भल्यासाठी त्यांना सोडावे लागेल. तसेच जर विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही तर रात्री नऊ नंतर भारत पाकिस्तान वर हमला करेल अशी पाकिस्तानला त्यावेळी भिती देखील होती.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा