मोकाट गुरांना रोखण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या मार्गावर ‘तारेचे कुंपण’

मुंबई, ४ डिसेंबर २०२२ : वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होत आहे. रेल्वे मार्गावर येणाऱ्या या गुरांच्या बंदोबस्तासाठी आता पश्चिम रेल्वेने ६२० किलोमीटर रेल्वे मार्गावर तारेचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.

ते म्हणाले, या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा मागवण्यात आली असून, या कुंपणासाठी २६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत चार अपघात झाले. या चारही अपघातांत वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता गुरांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेनलेस स्टीलचा वापर :

मुंबई ते गुजरातदरम्यान ६२० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर कुंपण घालण्यात येणार आहे. हे कुंपण स्टेनलेस स्टीलचे असणार आहे. जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर ‘डब्ल्यू-बीम’ स्ट्रक्चर असणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा