योग्य नियोजनाने लष्करी आळीचे नियंत्रण शक्य: प्रशांत मोहोळकर

इंदापूर, २९ जुलै २०२०: योग्य नियोजन आणी व्यवस्थापनेने मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण शक्य असल्याचे मत न्हावीचे कृषी सहायक पी.बी.मोहोळकर यांनी व्यक्त केले.

त्यांनी यावेळी सांगितले कि, सध्या खरीप हंगाम सुरु असून या हंगामात इंदापुर तालुक्यात मक्याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते पण अलीकडील काही वर्षापासून मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक किटकनाशकाचा वापर करताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नूकसान होत असून त्याचा म्हणावा तसा परीणाम दिसून येत नाही व परीणामी हेक्टरी मक्याचे उत्पादन घटुन शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

अमेरीकन लष्करी अळीचे एकात्मीक व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करता येवू शकते यात प्रामुख्याने मक्याचे शेत स्वच्छ व तणविरहीत ठेवणे, साधारण एक एकर मक्याच्या क्षेत्रात दहा ठिकाणी पक्षी थांबे तयार करणे मक्याच्या शेतीच्याकडेने एरंडीची झाडे लावणे, गुळाच्या पाण्याच्या फवारण्या करणे, निंबोळी अर्काच्या फवारण्या करणे,कामगंध व प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, वेळोवेळी कृषी विभागाच्या संपर्कात राहून तज्ञांचा सल्ला घेणे. इत्यादी उपायांनी आपण लष्करी अळीचे योग्य नियंत्रण करु शकतो तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या उपायांचा अवलंब करुन आपल्या शेतीची गुणवत्ता व आपली आर्थिक परिस्थिमध्ये सुधारणा करावी असे अवाहन कृषी सहायक पी.बी.मोहळकर यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा