उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता

सातारा :  माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांना निर्दोष ठरवलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांवर सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण केल्याचा आणि २४ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर राजकुमार जैन यांनी २२ मार्च २०१७ रोजी उदयनराजे भोसले यांच्या /विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात उदयनराजेंच्या अडचणी वाढल्याचंही बोललं गेलं. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने यावर निकाल सुनावत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणात उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा