बसपा कोणासोबत? एनडीए की इंडिया मायावतींनी जाहीर केली भुमिका

उत्तरप्रदेश, ३० ऑगस्ट २०२३ : उत्तर प्रदेशमधील बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी बसपा विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा फेटाळत, बसपा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २०२४ च्या सर्व निवडणुका ‘बसपा’ स्वतंत्र लढेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती मायावती यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

मायावती यांनी म्हटले आहे की, ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीमधील बहुतांश पक्ष हे गरीब विरोधी, जातीयवादी, भांडवलदार समर्थक आणि भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, त्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सतत संघर्ष करत आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी २०२४ च्या लोकसभा आणि राज्यसभा अशा सर्व निवडणुका बसपा स्वतंत्र लढणार आहे.

बसपा विरोधकांच्या जुगाड आणि हेराफेरी पेक्षा, परस्पर बंधूभावाच्या आधारे कोट्यवधी उपेक्षित अशा विखुरलेल्या समाजाला जोडून घेत आगामी निवडणुक लढणार आहे. २००७ प्रमाणेच लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे. त्यामुळे माध्यमांनी पुन्हा पुन्हा गैरसमज करून फेक न्युज पसरवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा