पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे मागं घ्या, पत्रकार सुरक्षा समितीची मागणी

सोलापूर, ६ ऑक्टोंबर २०२०: सर्वत्र कोरोना महामारीनं थैमान घातलं असून त्याचे पडसाद सोलापूर शहर व जिल्ह्यात उमटले असून केंद्र व राज्य सरकार पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महापालिका प्रशासन कोरोना रोगाला अटकाव करण्यासाठी संचार बंदी, जमाव बंदी सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करत आहे. या मध्ये पत्रकारांनी वार्तांकन करत असताना पोलिसांनी पत्रकारांवर गुन्हा दाखल करत मोटारसायकल जप्त करून कलम १८८ प्रमाणं गुन्हे दाखल केले आहेत.

सोलापूर शहरात अशा प्रकारचे दाखल झालेले गुन्हे यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगर वस्ती, जेलरोड, एम आय डी सी व सदर बाझार पोलीस ठाण्यात अनेक पत्रकारांवर संचार बंदी काळात गुन्हे दाखल करण्यात आले होते. लोकशाहीला मारक असून कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्यानं या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीनं निषेध व्यक्त केला असून संचार बंदी काळात पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ पाठीमागे घेण्यात यावेत यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे.

तसंच गुन्हा मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा