गोल पोस्ट गुन्हा २४ तासाच्या आत राजगृह हल्ल्यातील २ संशियत ताब्यात

२४ तासाच्या आत राजगृह हल्ल्यातील २ संशियत ताब्यात

मुंबई, दि. ८ जुलै २०२० : राजगृहावरील हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत त्याच्या आतच पोलिसांनी तत्परतेने दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्याचे डाॅ प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केले आहे. तसेच पुढील कार्यवाही लवकर करण्याची मागणी केली.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज देखील लागले असून त्या मध्ये आरोपी हा शांत डोक्याने येऊन हातातील ८ ते १० दगड्यांनी सीसीटीव्ही ला निशाणा केल्याचे दिसते व तसेच नंतर तो राजगृहातील आवारात प्रवेश करुन तेथील कुंड्याची नासधूस करताना दिसत होता. ज्या अर्थी हे दोन आरोपी हे कृत्य करत होते त्याअर्थी हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचे लक्षात येत आहे. पोलिसांनी आजच २ संशियतांना तब्यात घेतले आसून त्यांची चौकशी केली जात आहे, तर पुढील तपास चालू आहे.

पोलिसांच्या या तत्परतेने केलेल्या कार्याचे अनेक स्तरावरुन कौतुक केले जात आहे. महत्वाचे म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या चर्चेमध्ये राजगृहाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version