थर्ड अंपायरच्या निर्णयावरून साक्षी धोनीने व्यक्त केली नाराजी ,ट्विट करत म्हणाली…

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२०: इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला आपल्या दुसऱ्याच सामन्यात पराजयाचा सामना करावा लागला. मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई संघ १६ धावांनी पराजित झाला. या सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला अंपायरवर रागवतांना पाहायला मिळाले. हे आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा पाहायला मिळाले आहे. जेव्हा महेंद्र सिंग धोनीने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना राग व्यक्त केला आहे. याआधी सुद्धा २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीने अंपायर विरुद्ध राग व्यक्त केला होता.

राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी सुरू असताना टॉम करण याला आधी आऊट देण्यात आले आणि त्यानंतर निर्णय बदलत तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आली. आणि मुख्य बाब म्हणजे त्यावेळी राजस्थान संघाकडे एकही रिव्ह्यू उपलब्ध नव्हता. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने या निर्णयावरून एक ट्विट केले आणि काही क्षणातच ते ट्विट डिलिट करून टाकले.

राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीच्या वेळी १८ व्या षटकात टॉम करण याला आऊट देण्यात आले होते. परंतु आऊट दिल्यानंतरही रिव्ह्यू घेण्याच्या निर्णयावर धोनी नाखूश दिसून आला. दीपक चाहरच्या चेंडूवर विकेटकिपर धोनी याने झेल घेतला होता. आणि अंपायर शमसुद्दिन याने टॉम करण याला आऊट दिले होते. आणि राजस्थान संघाकडे रिव्ह्यू उपलब्ध नव्हता आणि फलंदाज पवेलियनच्या दिशेने जायला निघाला होता. यानंतर लेग अंपायर विनीत कुलकर्णी याच्यासोबत चर्चा करून शमसुद्दिन यांना आपली चूक कळून आली आणि त्यांनी तिसऱ्या अंपायरची मदत मागितली. यानंतर धोनीने नाराजी व्यक्त केली.

टेलिव्हिजनवर जेव्हा रीपले दाखवण्यात आला तेव्हा त्यात स्पष्ट दिसत होते की धोनीच्या हातात जाण्यापूर्वी चेंडू जमिनीला स्पर्श झाला होता. त्यानतंर तिसऱ्या अंपायरतर्फे निर्णय बदलण्यात आला. यावर साक्षी धोनीने ट्विट केले होते, “जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर  करत असाल तर त्याचा व्यवस्थित वापर करा. आऊट असेल तर आऊट जरी तो झेल असेल किंवा एलबीडब्ल्यू. रिपलेमध्ये जर पाहिले तर त्यात दिसून येत होते की चेंडू हातात जाण्यापूर्वी जमिनीला स्पर्श झाला होता. परंतु दुसऱ्या रिप्लेमध्ये दिसून येत होते की चेंडू  बॅटला नाही तर पॅड ला लागला होता. आणि तो एलबीडब्ल्यू आऊट होता.” हे ट्विट तिने काही क्षणातच डिलिट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा