नाशिकमध्ये दोन हजाराची लाच घेताना महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक १३ डिसेंबर २०२३ : व्यवसायासाठी मंजूर झालेला धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना महिला लिपिकाला रंगेहात पकडले. नाशिक येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सामाजिक न्याय भवनाच्या महिला लिपिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

तक्रारदारच्या मुलास व्यवसायासाठी महामंडळाच्यावतीने २ लाख १६ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या रकमेचा धनादेश संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कनिष्ठ लिपिक छाया विनायक पवार यांनी, ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच घेताना छाया पवार यांना रंगेहात पकडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा