गोल पोस्ट महाराष्ट्र अमरावतीच्या वरूड तालुक्यातील एकलविहीर येथे गुराखी महिलेची हत्या

अमरावतीच्या वरूड तालुक्यातील एकलविहीर येथे गुराखी महिलेची हत्या

वरूड, अमरावती ११ जुलै २०२४ : अमरावतीच्या वरूड तालुक्यातील एकलविहीर येथे गुराखी महिलेची हत्या करण्यात आलीय. नलिनी नामाक ४० वर्षीय महिलेचा गावातीलच स्मशान भुमीलगत असलेल्या जंगलामध्ये, गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार गेल्या अनेक वर्षापासुन सदर महिला गावातील गायी चारण्याचे काम करत होती. त्या घरी न परतल्याने त्यांचे पती शालिकराम धुर्वे यांनी पोलिस पाटील आणि वन कर्माचाऱ्यांसोबत शोध घेतला असता त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. त्यानंतर गावालगत असलेल्या स्मशानभूमि जवळील जंगलात त्यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. घटनेची माहिती वरुड पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस करतायत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : सागर डोंगरे

error: Content is protected !!
Exit mobile version