गोल पोस्ट महाराष्ट्र वादळाने पडलेल्या पोलच्या तारात दुचाकी गुंतून झालेल्या अपघातात महिला ठार

वादळाने पडलेल्या पोलच्या तारात दुचाकी गुंतून झालेल्या अपघातात महिला ठार

जालना १० मे २०२४ : जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात मौजे जोगेश्र्वरवाडी तळ्याच्या सांडव्यात वादळाने पडलेल्या पोलच्या तारात दुचाकी गुंतून अपघात घडलाय. दोघे पती पत्नी हिरो होंडा दुचाकीवर बसून संभाजी नगर येथे जात असताना हा अपघात घडला. यात दुचाकीस्वार बळीराम नुरा राठोड वय ५२ हे जखमी झाले तर त्यांची पत्नी तुळसाबाई बळीराम राठोड वय ४८ यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यु झाला.

या अपघाताला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली असून त्यांनी महावितरण कार्यालय जामखेड कार्यालयात जाऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला. अंबड ठाणेदार रघुनाथ नाचण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

error: Content is protected !!
Exit mobile version