पिटबुल कुत्र्याने महिलेच्या डोक्याचा तोडला लचका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

गुरुग्राम, १२ ऑगस्ट २०२२: यापूर्वी लखनऊमध्ये एका पिटबुल कुत्र्याने आपल्याच मालकिणीला हल्ला करून ठार मारलं होतं. या घटनेनंतर आता पिटबुलने हरियाणातील गुरुग्राममध्ये एका महिलेवर हल्ला केलाय. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तिचा जीव वाचवला. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या सिव्हिल लाइन परिसरात गुरुवारी सकाळी एक महिला आपल्या ड्युटीवर जात होती. दरम्यान, वाटेत एक पिटबुल कुत्रा फिरत होता. ही महिला त्या च्याजवळून जात असतानाच पिटबुलने तिच्यावर हल्ला केला. पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेला रक्तस्त्राव झाला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. पिटबुलने महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा केल्या.

महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथून तिला गंभीर अवस्थेत दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलिसांनी पिटबुल कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केलाय. असं सांगितलं जात आहे की, सकाळी पिटबुल कुत्रा मोकळेपणाने फिरत होता.

पीडित महिलेच्या वहिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, ती आणि तिची वाहिनी मुन्नी सिव्हिल लाइनवरील कृष्णा मॅन्सन घर क्रमांक ३०१ समोरून जात असताना पिटबुलचा मालक आणि मालकीण ने कुत्र्याच्या गळ्यातली साखळी सोडली आणि महिलेच्या दिशेने हल्ला करण्याचा इशारा केला. त्यानंतर पिटबुलने मुन्नी यांच्यावर हल्ला केला आणि चवण्यास सुरुवात केली. पिटबुलने मुन्नीचं डोकं, तोंड आणि कंबरेचं मांस तोडलं. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांनी मुन्नीला पिटबुलपासून वाचवलं.

सध्या गुरूग्राम पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पिटबुल कुत्र्याची मालक नीतू छिकाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. त्याचवेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी मुन्नीची प्रकृती अत्यंत बिकट होती आणि शरीरातून खूप रक्त वाहत होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा