तालिबानच्या राजवटीत महिला सोसत आहेत यातनाच….

अफगाणिस्तान, १९ ऑगस्ट, २०२२ : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य येऊन तब्बल वर्ष झालं. पण अजूनही तिथे महिलांना अनेक यातना भोगाव्या लागत आहे. अजूनही तिथे महिला असुरक्षित आहेत. रस्त्यावरुन फिरण्यास महिलांना मनाई आहे. महिलांना पूर्ण कपडे, अर्थात संपूर्ण अंग झाकणारेच कपडे घालण्याची सक्ती आहे. त्यातही बुरखा घालण्याची सक्ती आहे. अन्यथा त्यांना अनेक अत्याचारांना सामोरे जावं लागत आहे.

अफगाणिस्तानच्या महिलांमध्ये कायम भीतीचं वातावरण आहे. कॉलेजमध्ये जाणा-या मुलींना रोज जिवाची भीती असते. त्यातही जर त्यांनी चेहरा झाकला नाही, तर भर रस्त्यात त्यांच्यावर अनेक प्रकारचे घात होण्याची शक्यता असते. एखाद्या मुलीनी यावर आवाज उठवला तर त्या मुलीला जीवे मारण्याची किंवा शाळेतून, कॉलेजमधून बाहेर काढण्याची धमकी दिली जाते.
अर्ध्याच्यावर अफगाणिस्तान हा भुकेचा बळी आहे. त्यांना जेवायला पुरेसे अन्न नाही. तर पुरेसे कपडे नाही. तालिबानची सत्ता आल्यानंतर जेवायची भ्रांत झाली आहे. जेवायला तीन ते चार तुकडे ब्रेड किंवा एखादी वाटी भात अशा प्रकारचं अन्न मिळत आहे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर मारहाण केली जात आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही. त्यातही तेथे बेकरीच्या बाहेर महिलांची गर्दी होते. ते एका कागदावर स्वत:चा फोन नंबर लिहून ते कागदाचा तुकडा बेकरीच्या दिशेने फेकतात. बेकरीवाला जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांना ब्रेड पुरवतो. तेच त्यांचे जेवण.

अनेक तालिबानच्या सदस्यांनी आपल्या लैंगिक भूकेसाठी अनेक महिलांचा वापर केला आहे.
आज अफगणिस्तानवर तालिबानचं राज्य येऊन वर्ष झालं. तरीही महिला सुरक्षित नाही. मुलभूत गरजा देखील पूर्ण होत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य आल्यामुळे संकट वाढलंच आहे, हे मात्र नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा