देवणी,लातूर २० डिसेंबर २०२३ : देवणी, तालुक्यातील चवणहीप्परगा येथे व्यसनमुक्ती तसेच दारूबंदीसाठी मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली तर गावातील महिला मुलींनी रॅली काढत दारूबंदी एल्गार रॅली काढली. गावातील तरुण पिढी दारुच्या आहारी जात असल्याने चवणहिप्परगा ग्राम पंचायत आणि बब्रुवान पाटील यांच्या माध्यमातून मातृभूमी महाविद्यालय आणि नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. तसेच गावातील महिला मुलिंनी हातात दारुबंदीचे फलक घेत रॅली काढत व्यसनमुक्ती विषयी आवाज उठवला.
रॅलीत ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघाली नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीचे उद्घाटन मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उत्तरे बब्रुवान पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कुशावर्ता बेळे, सरपंच शकुंतलाबाई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच इस्माईल शेख, बालाजी पिलगुरे, तुकाराम बिरादार, दिलीप विटाळे, सत्वशीला कांबळे, सविता कांबळे, तुळशीराम तेलंगे, चांदपाशा शेख, राजश्री बिरादार, पोलीस पाटील प्रदीप पाटील, ग्रामसेवक एस बी अडसुळे, माधव मोरे, राहुल गुरमे, योगेश पल्लेवाड, नाना पाटील, राजेंद्र पिलगुरे, राहुल पाटील, संजीव गणेशपुरे, हर्षराज कांबळे, प्रा ओंकारे आदीची उपस्थिती होती. पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन मातृभूमी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी केले होते. पथनाट्यात वैभवी वराळे, तेजस्विनी सूर्यवंशी, दामिनी धनवे, वैष्णवी सूर्यवंशी, नागेश सुळकेकर, अरुण राठोड, प्रदीप माळगे, शुभम मादळे, गौरव कोंगे, धूर्वेश गोटमुकले, रोहित कांबळे तर संगीत योजन धम्मदीप तिगोटे आणि देवरुप कांबळे यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : महादेव रोडगे