चोपडा येथील इनर व्हील क्लब ऑफ चोपडा व भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्र, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच समाज प्रबोधनपर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ए.टी.डी. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेत महिला सुरक्षा व महिला सबलीकरण या विषयांवर व्यक्तिचित्र प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध चित्रे व घोषवाक्यांच्या माध्यमातून समाजाला प्रभावी संदेश दिला. “महिलांना शिकवा, महिलांना वाचवा, त्यांना त्यांचे हक्क द्या, महिला शिकल्या तर देश पुढे जाईल, महिलांवरील अन्याय थांबवा” अशा आशयाचे सुचक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आले.
या प्रदर्शनात देवांशी जितेंद्र कुमार पित्रोडा (धरणगाव) – ए.टी.डी. द्वितीय वर्ष हिला प्रथम क्रमांक, पार्थ योगेश महाजन (अमळनेर) याला द्वितीय क्रमांक, तर विवेक सुनील पाटील (चोपडा) – ए.टी.डी. प्रथम वर्ष याला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच सुरेखा सुरसिंग पवार (पाचोरा) व अव्वाब सिराज हलवाई (चोपडा) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राच्या स्वरूपात देण्यात आली.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला इनर व्हीलच्या अध्यक्षा सौ. भारती बोरसे, उपाध्यक्ष नीतू अग्रवाल, सेक्रेटरी शैला सोमानी, खजिनदार सीमा पाटील, आयएसओ वंदना पाटील, अंजली देशमुख, सल्लागार अश्विनी गुजराथी, सौ. पुनम आशिषलाल गुजराथी (अध्यक्षा, भगिनी मंडळ चोपडा), प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, श्री. भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी तसेच समस्त विद्यार्थी परिवार उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील











































