जालना १४ जानेवारी २०२४ : जालना शहरातील बाजारपेठ भोगी व मकर संक्रातीच्या निमित्ताने सजली आहे. सुवासिनीचा मकर संक्रात हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व असते. त्यासाठी वाणांचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. वाणांसाठी खण तसेच साडी, जोडवे इत्यादी साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी लगबग बाजारात दिसून येतेय.
संक्रातीच्या एक दिवस आधी सुवासिनी भोगी सण साजरा करतात. यासाठी या हंगामातील भाज्या व धान्य घालून पूजन करतात. बिबा फुल, बोर, हरभरा, गाजर, ऊस, धान्याचे कणीस, यासह तीळगुळ अन्य लागणार खरेदी करताना दिसून येत आहेत. याचबरोबर संक्रात सण साजरा केल्यानंतर वान देण्यासाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रमाचे ठिकठिकाणी महिला आयोजन करतात.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा संदेश देत प्रेम, आपुलकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. यासाठी सौंदर्यप्रसाधने व साड़ी जोडवे इत्यादी साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी