पीएमपीएमएल बसमध्ये महिला असुरक्षित ? आपत्कालीन बटणे निकामी !

11

पुणे ९ फेब्रुवारी २०२५ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएल बससेवेतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेली आपत्कालीन बटणेच बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बसमधील आपत्कालीन बटणे म्हणजे संकटकाळी मदतीसाठी असलेला एकमेव आधार. छेडछाड, अपघात किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्येवेळी या बटणाद्वारे थेट बसचालक आणि वाहकाला संपर्क साधता येतो. मात्र, ही बटणेच काम करत नसल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला प्रवाशांचा संताप

“हे काय चाललंय? ” नेहा जवादे या विद्यार्थिनीने संतप्त सवाल केला. “महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला या गंभीर समस्येची जाणीव आहे की नाही?”

शितल पुंडे या गृहिणी म्हणाल्या, “प्रवासात काही झाल्यास मदत मागायची कशी? प्रशासनाने यावर तातडीने उपाय शोधायला हवा.”

“आम्ही पीएमपीएमएल बसमध्ये सुरक्षित आहोत का?”, असा प्रश्न काशी देवगिरे या ज्येष्ठ महिलेने विचारला.

“प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा आहे.”

तातडीने उपाययोजना आवश्यक

या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

  • सर्वप्रथम, सर्व बसमधील आपत्कालीन बटणे कार्यान्वित करावी लागतील.
  • बसचालक आणि वाहकांना महिला सुरक्षेबाबत विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
  • नियमित सुरक्षा तपासणी आणि ऑडिट करणेही महत्त्वाचे आहे.
  • यासोबतच, महिला प्रवाशांसाठी एक खास हेल्पलाइन सुरू करणे आणि बसमध्ये सुरक्षा सूचनांचे फलक लावणे आवश्यक आहे.

महिला सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित ठेवल्यास पीएमपीएमएल प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा