महिला बिग बॅश लीगचा क्रिकेट सामना अर्ध्यातच थांबवला; जाणून घ्या अनोखं कारण

13

ओव्हल (नॉर्थ सिडनी), २८ नोव्हेंबर २०२२ : ॲडलेड स्ट्रायकर्स संघाने शानदार कामगिरी करीत महिला बिग बॅश लीगच्या आठव्या सत्राचे विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १४७ धावा केल्या. ड्रिआंड्रो डॉटिनने सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. केटी मॅकने ३१ आणि तहलिया मॅकग्राने २४ धावा केल्या. फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने सिडनी सिक्सरच्या दोन खेळाडूंना बाद केले. तर सिडनी सिक्सर संघ पूर्ण वीस षटके खेळूनही १३७ धावांवर पराभूत झाला.

अनेकवेळा पावसामुळे खेळ थांबवावा लागल्याचे आपण पाहतो; परंतु यावेळी प्रखर सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवावा लागला आहे. तर घडलं असं, की डिआंड्रो डाॅटिनने अर्धशतकी खेळीशिवाय दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर सिडनी सिक्सरची इनिंग सुरू होण्यापूर्वी सूर्यप्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला. सुजी बेटस आणि एलिसा हिली या दोन खेळाडू संघाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. सुजी बेटसला स्ट्राईक घ्यायची होती; पण प्रखर सूर्यप्रकाशामुळे खेळण्यास त्रास होत होता. त्यामुळे पंचांनी काही काळ खेळ थांबवला. सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवावा लागण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी घटना घडली आहे.

सिडनीच्या एम. ब्राउनने सर्वाधिक ३४ आणि कर्णधार ॲलिसा पेरीने ३३ धावा केल्या; तसेच निकोल बोल्टने गेल्या सामन्यात ३२ धावांचे योगदान दिले. ॲडलेड स्ट्रायकर्सकडून वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउन आणि ड्रिआंड्रो डॉटिनने प्रत्येकी दोन घडी बाद केले. ड्रिआंड्रो
डॉटिनने सामनावीर आणि ॲशले गार्डनर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. ओव्हल, नॉर्थ सिडनी येथे शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात ॲडलेड स्ट्रायकर्सने सिडनी सिक्सरचा १० धावांनी पराभव केला. ॲडलेड स्ट्रायकर्सने महिला बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले त्याचवेळी सिक्सरचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. हा सामना सुरू असतानाच एका अनोख्या कारणामुळे सामना थांबवावा लागला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा