महिला आरक्षणाचं स्वागत, पण ओबींसींच काय? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२३ : ओबीसीसाठी मोदी सरकारने काय केले? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ओबींसींसाठी बजेटमध्ये फक्त पाच टक्के तरतूद आहे. देशात ओबीसी लोकसंख्या किती, मोदी सरकारने स्पष्ट करावं. ३३ वर्षात ओबीसीमधून फक्त तीन सचिव झाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, महिला आरक्षणाचं स्वागत आहे. पण ओबीसीचे काय? महिला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिलाच. पण लक्ष विचलित करण्यासाठी महिला आरक्षण आणलं गेलं. ओबीसीचा विकास केवळ मोदींचा खोटा दावा आहे. भाजपचे खासदार म्हणजे फक्त पुतळे, त्यांना अधिकार नाहीत. ओबीसी जनगणना करा. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी राहुल गांधी यावेळी मागणी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा