शब्द मोडला….

मुंबई, 28 मे 2022: अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी मागे घेत आहे. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे. हे शब्द आहेत संभाजीराजे छत्रपती यांचे… शब्दातून नाराजी व्यक्त करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला आणि या चर्चांना पूर्णविराम दिला.

गेले पंधरा दिवस मुख्यमंत्री काय निर्णय घेणार , कोण उमेदवार असणार , शिवसेना संभाजी राजे यांना पाठिंबा देणार का? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं होतं. पण अखेर संभाजीराजेंनी या प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर देऊन मुख्यमंत्र्यांप्रती नाराजी व्यक्त केली. पुन्हा मी मावळ्यांचे स्वराज्य घडवण्यासाठी मोकळा असून राज्य पिंजून काढणार आहे, असं त्यांनी सांगितले.
पण हे नाट्य खूप विचित्र होतं. शिवसेनेने संभाजी राजे यांना पाठिंबा तर दाखवला होता, पण त्याचबरोबर शिवबंधन बांधण्याचा आग्रह ही होता.याचे शिवसेनेवर दोन महत्वाचे फायदा होणार होते. एक म्हणजे संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेचे मावळे आणि त्यांची मत शिवसेनेला मिळाली असती. तसेच हक्काचा राजा शिवसेनेत आल्याने विजयाची भूमिका शिवसेना घेऊ शकत होती. पण शिवसेनेची स्वप्न भंग करण्यात राजे यशस्वी ठरले . मी कोणत्याही पक्षाला बोलणार नाही, म्हणत त्यांनी स्वत:ला सेफ ठेवल आहे, हे मात्र नक्की.

पण यावर संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांकडून अशा शब्दाची आणि अशा भूमिकेचे अपेक्षा नव्हती, असं माध्यमांकडे स्पष्ट केलं. त्याचा परिणाम आता निवडणूकीत सकारात्मक पहायला मिळतो की नकारात्मक हे निकालानंतरच पहायला मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा