आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

पुरंदर, दि. १७ जून २०२० : पुणे जिल्हा अंतर्गत कार्यरत असणारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एन.एच.एम) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सोमवार दि.१५ पासून सुरू झाले आहे. त्यामुळे हे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी सध्या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत, यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर ताण येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेली दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने कर्मचारी बिनशर्त शासनाच्या आरोग्य विभागामध्ये सेवा करीत आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये समायोजन करण्याची मागणी गेली अनेक वर्ष ते करीत आहेत. मात्र शासन यांच्या रास्त मागणीला कोणताही पाठिंबा देत नाहीत. कोरोना काळात त्यांना सक्तीने काम करणे भाग आहे. तेर हे कर्मचारी कोणतेही आढेवेढे न घेता रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून कोरोना काळातही धोका पत्करून काम करीत आहेत.

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. गेली आठ-दहा वर्ष हे कर्मचारी तोडक्या मानधनावर काम करीत आहेत. आजही कोरोनाच्या काळातही त्यांच्यावर अधिक खर्च शासन करीत नाही. त्यामुळे १५ जून पासून या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांची रास्त मागणी लवकरात लवकर मान्य करावी; असे पत्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सासवड येथील तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक आबनावे यांना दिले. यावेळी सुनीता कोरे, बेबी तांबे,शुभांगी चव्हाण व इतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा