पुणे, ३० ऑक्टोबर २०२० : शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्र १४ या प्रभागाची कार्यकारिणी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत जाहीर केली.
शिवाजी मतदारसंघाने सर्वप्रथम प्रभागाची कार्यकारिणी जाहीर केली यावेळी खूप मोठ्या संख्येने प्रभागातील कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका जोत्सना एकबोटे, नीलिमा खाडे, अपर्णा गोसावी, नीलिमा ढेरे, रवींद्र साळेगावकर,धनंजय जाधव, निलेश कोंढाळकर, गणेश बगाडे, प्रतुल जागडे, अपूर्व खाडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे