जालना २८ जुलै २०२४ : एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांची तसेच उपक्रमाची जागरुकता वाढविण्यासाठी, जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उद्या सोमवार दि.२९ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता महसूल भवनात करण्यात आले आहे.
या एक दिवसीय कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. कार्यशाळेत गुंतवणूक, निर्यातवृध्दी, उद्योग सुलभीकरण, एक जिल्हा एक उत्पादन, डिजीटल मार्केटींग इत्यादी विषयांवर चर्चासत्र आयोजित केले असून अधिकारी व अनुभवी प्रवक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी