श्रीक्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठ्या पगडीचे होणार लोकार्पण;

23
Shri Kshetra Dehu's Sant Tukaram Maharaj temple decorated for the unveiling ceremony of the world's largest turban, featuring a grand entrance adorned with flowers and a prominent Garuda statue above the gate. Inset image shows a close-up of the massive white turban, crafted from 450 meters of fabric.
श्रीक्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठ्या पगडीचे उद्या होणार लोकार्पण; वर्ल्ड बुकमध्ये होईल नोंद

World’s Largest Turban Unveiling Ceremony Shri Kshetra Dehu: जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे औचित्य साधून उद्या (दि. ११) श्रीक्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पगडीचा घेराव २२ फुटांचा असून, उंची ४ फूट आहे. या भव्य पगडीसाठी तब्बल ४५० मीटर लांबीचा मोटर आलोबीचा कपडा वापरण्यात आला आहे.

भव्य लोकार्पण सोहळा: जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात सकाळी ११ वाजता हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अँण्ड जिनिअस फाउंडेशनचे सीईओ पवनकुमार सोलंकी आणि संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट-श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

श्रद्धा आणि सद्भावनेतून निर्मिती: दिलीप सोनिगरा यांनी सांगितले की, “जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे. याच सद्भावनेतून आम्ही जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अँण्ड जिनिअस बुकमध्ये या पगडीची नोंद होईल.” ही पगडी भाविकांना दर्शनासाठी खुली राहणार आहे.

पगडीची वैशिष्ट्ये;

  • घेराव: २२ फूट
  • उंची: ४ फूट
  • कपडा: ४५० मीटर मोटर आलोबीचा कपडा
  • स्थळ: श्रीक्षेत्र देहू, जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर
  • वेळ: सकाळी ११ वाजता

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांब

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा