आई शब्द ऐकता क्षणी काळजाला एक वेगळी अनुभूती देतो. अनेकांचे विश्व आपल्या या मातृत्व हृदयाकडे असते. मला जन्म देताना मातृत्वाला झालेल्या वेदना या वेदना नसून तिचा दुसरा जन्म असतो.त्यानंतर बाळाबरोबर जगत असलेले तीचे आयुष्य पूर्णपणे वेगळे आणि नवीन ऊर्जा देणारा असतो. पण गर्भावस्थेत असताना अनेक वेळा बाळाला जन्म देता देता आईला आपले प्राण गमवावे लागते. अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाला मातृत्व सुरक्षा दिवस म्हटले जाते.
माता आणि होणाऱ्या मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याची सुरूवात केली. २००५ सालापासून १० जुलै सर्वत्र मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा कऱण्यामागचा हेतू म्हणजे मातांचे आरोग्य. मातांचे आरोग्य आणि मातृत्वादरम्यान मांतांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करण्याचा हा दिवस.
अनेकदा डिलीव्हरीदरम्यान मातांना असलेल्या ब्लडप्रेशर तसेच हृदयाशी संबंधितआजारांमुळे मृत्यूचा धोका वाढतो. अनेकदा बाळाच्या जन्मादरम्यान खूप रक्तस्त्राव झाल्याने तसेच रक्तदाब नियंत्रित न राहिल्याने मातांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी गर्भवती असताना होणाऱ्या मातेने आपली योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गर्भारपणात योग्य काळजी घेतली नाही तर प्रसूतीदरम्यान मातांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
१० जुलैला का मातृ सुरक्षा दिवस असतो?
मातृ सुरक्षा दिन साजरा करण्याच्या मागचा मुख्य उद्देश गर्भअवस्था दरम्यान होणाऱ्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण ठेवणे तसेच या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण उपचारांवर लक्ष दिले जाते. जेणेकरून या उपचारांमुळे माता आणि बाळ सुरक्षित रहातात. मातृ सुरक्षा दिन १० जुलै रोजी साजरा करण्यात येतो कारण ११ जुलैला आपण विश्व लोकसंख्या दिन साजरा करतो. ज्या मुळे लोकसंख्येमध्ये जगातील मातृत्वांच आरोग्य किती सुरक्षित आहे हे समजते. तसेच पुढील लोकसंख्येवर निर्बंध घालून मातृत्वांच्या आरोग्य विषयी अधिक सुरक्षितता बाळगण्यात येते.