‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’

10 ऑक्टोम्बर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. 1982 पासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला.

*मुळात मानसिक आरोग्य* नावाची काही गोष्ट असते हेच अनेकांना ठाऊकच नसते. मानसिक आरोग्य विषयी वेगळा विचार करायला हवा हेच अजून आपल्या मनात रुजलेले नाही. जागतिक आरोग्य संघटने नुसार जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. भारतात हीच संख्या एकूण 1.5 दशलक्ष आहे .  या मध्ये मुले आणि पौगंडावस्थेतील समस्या तसेच विविध मानसिक आरोग्य समस्यांचा समावेश होतो.
मानसिक विकार म्हणजे काय?
व्यक्तीच्या आजूबाजूला आढळणाऱ्या परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी या माफ़हे जेंव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकत नाही/शकली नाही तर त्या वेळी अश्या विकारांचा जन्म होतो आणि त्या मधूनच व्यक्ती मध्ये असामान्य वर्तन तयार होते.
 
*मानसिक आजाराची मूळ कारणे?*
निराशा, एकाकी पणा, मित्राकडून दबाव, कमी प्रतिष्ठा, आत्मविश्वासाची कमी, आवडत्या व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबातील चिंता,घटस्फोट,अपघात, हिंसा,बलात्कार,अनुवांशिक विकृती, व्यसनाधीनता, स्रियांमधील मनोकायिक आजार.
 
*नैसर्गिक तर्हेने न्यूरोकेमिकल चे प्रमाण कसे वाढेल*
शिथिलीकरण तंत्र(Relaxation technique), 
ध्यान धारणा(मेडिटेशन),
नवनवीन गोष्टी शिकत रहा,
स्वतःची दैनंदिन/रोजनिशी बनवा, गरजेपुरते आणि कमित कमी खा, नियमित व्यायाम करा, दिवसातून कोमट पाण्याने आंघोळ करा , सकारात्मकता वाढवा.
 
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*वेध मनाचा-HELATH POINT*
*प्रा. उज्ज्वला पाटील*
(Clinical psychologist & School Counselor, Hypnotherapist)
*Contact: 8308674694*

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा