World mental health day: कशी कराल तुमच्या मानसिक आजारावर मात

पुणे, १० ऑक्टोंबर २०२२: जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश हा लोकांमधे मानसिक स्वास्थ्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा आहे. मानसिक स्वास्थ्य हे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या आयुष्यात आणि समाजात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे आपल्या मानसिकतेवर होणारा त्याचा परिणाम. यावर अवलंबून असते. काही गोष्टींचा जास्त ताण घेतल्याने आपली विचारशक्ती अणि आपले वागणे बदलते.

मानसिक समस्यांची अनेक कारणे असू शकतात. त्यातील काही आहेत-

◾जैविक घटक
◾ जीवनात येणारे अनुभव
◾ आनुवंशिकता
◾ सामाजिक घटक
◾ ताण तणाव

अनेकदा आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. काहींना तर आपण एक मानसिक रुग्ण आहोत हे देखिल माहीत नसतं. त्यांच्यासोबत वावरणाऱ्या लोकांनासुद्धा याची खबर होत नाही. त्यामुळे डॉक्टरांपर्यांत हे विषय जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण याचे गांभीर्य लोकांनी ओळखायला हवं. आपल्या विचारात, वर्तवणुकीत, भावनेत झालेला बदल आपण ओळखायला हवा.

मानसिक आजार तुम्ही कसे ओळखाल.

१ सतत नैराश्य वाटणे
२ भावनांचे होणारे उतार चढाव
३ झोप न येणे
४ एकटेपण जाणवणे
५ भीती वाटणे
६ चिडचिड होणे
७ आळस येणे
८ काम न करता थकवा जाणवणे
९ सतत होणारे भास किंवा भ्रम
१० असुरक्षित वाटणे

कशी कराल तुमच्या मानसिक आजारावर मात

सर्वात प्रथम तर तुम्ही एक मानसिक रुग्ण आहात हे ओळखा.

योग्य व्यक्तीचा, मानसोपचरतज्ञांचा सल्ला घ्या.
तुमच्या आवडत्या गोष्टीत मन रमवा.

मित्र मैत्रिणींबरोबर, कुटुंबा सोबत वेळ घालवा.

व्यायाम, योगा, ध्यान करायला लागा.

अनावश्यक गोष्टींचा जास्त विचार करणे टाळा.

गोष्टी मनात न ठेवता व्यक्त व्हा.

आपल्या कामात लक्ष केंद्रित करा.
वास्तविकता स्वीकारून त्यावर मात करा.

विचारांमध्ये वास्तविकता आणण्याचा प्रयत्न करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: केतकी केळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा