पुणे, १० सप्टेंबर २०२० : आजचा १० सप्टेंबर , हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळण्यात येतो. अतीव नैराश्य, प्रचंड मानसिक ताण, एकटेपणा ही आत्महत्येची कारणं असू शकतात.
अशा कठीण मानसिक स्थितीतून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम देशभरात अनेक संस्था करत आहेत. निराशेचे विचार मनात येऊ लागले तर समुपदेशनाचं काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधावा असं आवाहन या क्षेत्रातील कार्यरत तज्ञ आणि समुपदेशकांनी केलं आहे.
दरवर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी