बारामती, ९ ऑगस्ट २०२०: ९ ऑगस्ट रोजी असणाऱ्या “जागतिक आदिवासी दिन” संपूर्ण विश्वामध्ये आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. बारामती तालुक्यात देखील विश्व आदिवासी दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारक व कुलदेवता यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आदिवासी समाजाचे स्वतंत्र चळवळीतील योगदान तसेच आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान व आदिवासी संस्कृती याबद्दल मार्गदर्शन शंकर घोडे यांनी केले.
आदिवासी समाज हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आदिवासी समाजाला जर प्रगत करावयाचे असेल, तर समाजातील नोकरदारांनी गावागावांमध्ये जाऊन समाजाच्या प्रगतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आदिवासी नोकरदार लोकांनी आदिवासी वस्त्या व गावांमध्ये जाऊन संस्कृती संवर्धन व जतन करण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असेही घोडे म्हणाले.
आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय बीरसा ब्रिगेड या संघटनांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन व समाजाच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबाविले जातात. अनेक मेळाव्यांच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केले जाते.
आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य या चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये व सह्याद्रीच्या पट्ट्यात संस्कृती संवर्धन, शैक्षणिक विकास व कला – क्रीडा अशा अनेक विषयांवर निस्वार्थी पणाने सध्या काम करत आहे असे यावेळी घोडे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव