कॅमेऱ्यात ८२ फूट लांबीचा जगातील सर्वात मोठा प्राणी

आस्ट्रेलिया, ६ सप्टेंबर २०२०: ऑस्ट्रेलियन शहर सिडनीच्या किनारपट्टीजवळ जगातील सर्वात मोठा प्राणी कॅमेरात कैद झाला आहे. त्याची लांबी ८२ फूट असून वजन सुमारे १ लाख किलो आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार जगातील या सर्वात मोठ्या प्राण्याचे नाव ब्लू व्हेल आहे ज्याचे फुटेज फारच दुर्मिळ आहे. हे दृश्य १८ ऑगस्ट रोजी @seansperception नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने अपलोड केले होते, ज्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
     

ब्ल्यू व्हेल पृष्ठभागावर फारच क्वचित दिसतात आणि ते पाहणे फारच दुर्मिळ आहे. ब्लू व्हेलचा हा व्हिडिओ आकाशातूनही रेकॉर्ड करण्यात आला आहे. ब्ल्यू व्हेल समुद्राच्या किनाऱ्यापासून बरेच दूर राहतात. त्यांची संख्या मोठ्या क्षेत्रात पसरली आहे. त्यांच्या स्थलांतर आणि निवासस्थानाबद्दल फारच कमी माहिती आहे.
     

ब्ल्यू व्हेल दररोज ३६ हजार किलो पर्यंत अन्न खातो. त्यांच्या जेवणात जास्तकरून क्रिल असतात. ब्ल्यू व्हेलची जीभ हत्तीच्या सोंडे एवढी असते तर त्याचे हृदय एका कारच्या आकाराचे असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा