वरळी ‘सी लिंक’ खातोय भाव

31

मुंबई;वांद्रेहून दक्षिण मुंबईला जोडणारा सुपरफास्ट करणारा सागरी पुल म्हणजेच वांद्रे-वरळी सी लिंक. मुंबईत हा पूल झाल्यानंतर मुंबई आणखी आकर्षक दिसू लागली. रात्रीच्या वेळी या पुलावर लागणारी लाईट सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. या पुलाविषयी काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का….

प्रत्यक्षात या पुलाचे मुळ नाव आहे राजीव गांधी सी लिंक. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव या लिंकला दिले गेले. तरीही या पुलाची ओळख वांद्रे-वरळी सी लिंक अशीच आहे. हा पूल इतका मजबूत आहे की या पुलाची तुलना ५० हजार अफ्रिकन हत्तींसोबत केली जाते.
भारतातील हा पहिला असा सी लिंक आहे. ज्यावर तब्बल ८ लेन आहेत. कुतुब मिनारच्या ६३ पट उंच या सीलिंकची उंची आहे. १२६ मीटर उंचीचा हा पूल असून ६६फुटांचा हा पूल आहे.
या सीलिंकच्या ८ लेनपैकी सुरुवातीचे ४ लेन हे ३०जून २००९साली सुरू झाले. संपूर्ण पूल २४ मार्च २०१० साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या पुलामुळे वांद्र्यातून वरळीत येण्यासाठीचा तास- दीड तासांचा प्रवास अवघा २०ते ३० मिनिटात शक्य झाला आहे.
हा पुल सुरू झाला तेव्हा सुरुवातीचे 30 दिवस या पुलावर मोफत प्रवास करता येत होता. मात्र त्यानंतर या लिंकवर येण्यासाठी ६० रुपये टोल भरण्याचा नियम लागू करण्यात आला. १९९९ साली शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या लिंकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं होते.
या पुलाचे काम अवघ्या ५ वर्षात होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही विरोधामुळे या पुलाचे काम १०वर्षांनी पूर्ण झाले. या लिंकचं भूमिपूजन झालं तेव्हा या कामाला ६६० कोटींची तरतुद करण्यात आली होती. मात्र कालांतराने या कामासाठी १६०० कोटी खर्च करण्यात आला. या पुलाचे संपूर्ण बांधकाम भारतीय कारागिरांसोबतच जगभरातील ११ देशातील आर्किट्रेक्चर संस्थानी या कामाला हातभार लावला आहे.