वॉशिंग्टन, ५ जानेवारी २०२१: कोरोना साथीने संपूर्ण जगाची आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य प्रणाली नष्ट केली आहे. बर्याच देशांमध्ये अशी वाईट परिस्थिती आहे की लोकांना तेथे अन्नही मिळत नाही. सध्याची आर्थिक परिस्थिती ही २००८ च्या मंदीपेक्षाही वाईट आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणजे अमेरिकेची सर्वात वाईट स्थिती आहे. अमेरिकेत रोजगाराचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांकडे पैसे नसल्याने ते पोट भरण्या इतपत देखील खाऊ शकत नाहीत.
भुकेवर काम करणार्या ‘फीडिंग अमेरिका’ संस्थेने नुकताच एक खुलासा करून संपूर्ण जगाला चकित केले आहे. ‘फीडिंग अमेरिका’च्या अहवालानुसार मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरअखेरपर्यंत अमेरिकेतील ५० कोटीहून अधिक लोकांना २ वेळचे जेवण देखील मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक सहाव्या व्यक्तीस येथे उपासमार सहन करावी लागत आहे.
केवळ प्रौढ च नाही तर या साथीचा सर्वात मोठा फटका मुलांनाही बसला आहे. अमेरिकेतील प्रत्येक चौथे मूल उपाशीपोटी राहत आहे. २०१९ च्या जून महिन्यापासून अमेरिकेत रोजगाराची समस्या निर्माण झाली होती. कोरोनामुळे लोकांनी नोकर्या गमावल्या. परिणामी लोकांना अन्नटंचाई जाणवू लागली.
कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत गरजू लोकांची कोरोना पूर्वीच्या दुप्पट वाढ झाली आहे. हे गरजू लोक अधिक बेरोजगार आणि कुपोषित आहेत. त्याच वेळी, गरजू कुटुंबांमधील मुलांची संख्या तीन पट वाढली आहे.
‘फीडिंग अमेरिका’च्या अहवालानुसार, त्यांच्या नेटवर्कद्वारे देशभरात सरासरी दर महिना ५४.८ कोटी फूड पॅकेटचे वितरण केले गेले आहे. तर, साथीच्या आजार होण्यापूर्वी भुकेलेल्या लोकांना याच्या अर्ध्या संखे इतकी खाद्यपदार्थाची पाकिटे वाटली गेली. दरवर्षी अमेरिकेच्या ख्रिसमसच्या मुख्य उत्सवात ‘फीडिंग अमेरिका’ ५००० लोकांना जेवण पुरवत होती. यावेळी ख्रिसमसच्या सनादर्म्यान ८,५०० लोकांना जेवण पुरवावे लागले.
कृष्णवर्णीय, आशियाई आणि लॅटिन-अमेरिकन लोकांची अमेरिकेत सर्वात वाईट परिस्थिती आहे. तथापि, अमेरिकन लोक एकमेकांना मदत करीत आहेत. समुदाय पातळीवर लोकांना फ्रीज, कॉफी मशीन, खाद्य इत्यादी सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून असे आवाहन केले जात आहे की, लोकांपर्यंत शक्य तेवढे जेवण पुरवले जावे.
अमेरिकेत अशा बर्याच संघटना आहेत ज्या देशभरातील लोकांकडून पॅकेज केलेल्या अन्नाची मागणी करतात आणि हे अन्न ते या सार्वजनिक फ्रिजमध्ये ठेवतात. ज्या व्यक्तीला भूक लागते, तो त्यामधून अन्न काढून खातो. न्यूयॉर्क फूड बँकेने साथीच्या काळात आतापर्यंत ७.७ कोटी फूड पॅकेटचे वितरण केले आहे. तर ही बँक सामान्य वर्षांत एक कोटी फूड पॅकेटचे वितरण करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे