गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय WWE स्टार सारा ली’चे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप

WWE स्टार सारा ली’चे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर २०२२ : क्रीडा जगतासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) कुस्तीपटू सारा ली यांचे निधन झाले आहे. WWE स्टार सारा लीचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजलेले नाही. सारा लीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर डब्ल्यू व्यतिरिक्त अलेक्सा ब्लिस, बेकी लिंच, मिक फॉली यांसारख्या अनेक स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. त्यांचे वय फक्त ३० वर्षे होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून साराच्या मृत्यूची बातमी तिच्या आईने दिली होती. अशी बातमी ऐकल्या नंतर तीचे चाहते खूपच अस्वस्थ झाले आहेत. तिच्या पोस्टमध्ये साराच्या आईने केवळ मृत्यूची माहिती दिली.

WWE मध्ये सारा लीने जवळपास वर्षभर संघर्ष केला आहे. सारा ली हील प्रोमो देताना २०१६ मध्ये एका लाइव्ह कार्यक्रमादरम्यान दिसली. त्यातील काही दिवसांनंतर जानेवारीमध्ये सारा ली सहा – महिला टॅग टीम मॅचमधून तिने इन-रिंग पदार्पण केले. त्यादरम्यान मॅंडी रोजनेही या शोमध्ये भाग घेतला होता. सारा ली WWE च्या रिअॅलिटी सीरिज टफ इनफच्यार सीझन ६ ची विजेती देखील आहे. साराने तिचा शेवटचा सामना, २०१६ च्या शेवटी खेळला. त्या काळात ऑगस्टमध्ये सारा लीने दुहेरीचा सामना खेळला होता. लिव्ह मॉर्गन हा सारा लीचा पार्टनर होता. त्यानंतर आलिया आणि बिलीसोबत २०१६ च्या अखेरीस दोघींच्या मध्ये लढाई झाली.

तिचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. सारा लीने पाच वर्षांपूर्वी माजी WWE सुपरस्टार वेस्ली ब्लेकसोबत लग्न केले होते. सारा लीने ३० डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. या लढतीनंतरच सारा ली स्वतंत्र सर्किटमध्ये परतली. तेव्हा ती WWE मधून मुक्त झाली. सारा ली ही एक मजबूत कुस्तीपटू असलेली एक सुंदर चेहरा देखील होती. तिने तीच्या इंस्टाग्रामवर तीचा परिचय म्हणून माजी NXT/WWE सुपरस्टार लिहिले होते. याच्या खाली, तिने हे देखील सांगितले की ती रिअॅलिटी मालिका टफ इनफ सीझन ६ ची विजेती देखील आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version