Xiaomi 11T Pro या दिवशी होणार भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

पुणे, 11 जानेवारी 2022: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक Xiaomi 11T Pro कंपनीने गेल्या वर्षीच लॉन्च केला होता. तो आता भारतात आणला जात आहे.

Xiaomi 11T Pro 19 जानेवारी रोजी भारतात लॉन्च होईल. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, जो सहसा इतर स्मार्टफोनमध्ये कमी दिसतो.

कंपनीने आपल्या अधिकृत हँडलवरून Xiaomi 11T Pro चा टीझर रिलीज केला आहे. या व्यतिरिक्त, Xiaomi च्या वेबसाइटवर Xiaomi 11T Pro 5G साठी एक मायक्रोसाइट देखील बनवण्यात आली आहे जिथं या फोनचे इतर तपशील आहेत.

Xiaomi 11T Pro ची युरोपमध्‍ये किंमत 649 युरोपासून सुरू होते, म्हणजेच सुमारे 54,599 रुपये. ही किंमत बेस मॉडेलसाठी आहे, ज्यामध्ये 8GB RAM सह 128GB स्टोरेज आहे. शीर्ष मॉडेलमध्ये 12GB RAM सह 256GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 749 युरो म्हणजेच सुमारे 62,900 रुपये आहे.

Xiaomi 11T Pro च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल़ं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यासोबत Qualcomm Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे.

Xiaomi 11T Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेलची आहे जी अल्ट्रा वाइड आहे. याशिवाय टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे.

Xiaomi 11T Pro 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 120W हायपरचार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. आता Mi सीरीजमधून लॉन्च केलेला फोन Xiaomi नावाने लॉन्च केला जात आहे. त्यामुळं तुम्ही गोंधळात असाल तर लक्षात ठेवा की आता Mi सीरीजचे स्मार्टफोन येणार नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा