नवी दिल्ली: चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स-निर्माता कंपनी शाओमीकडे भारतीय ऑफलाइन बाजारात २५००+ एमआय स्टोअर्स, ७५+ एमआय होम आणि २०+ एमआय स्टुडिओ असलेले सर्वात मोठे ब्रँड नेटवर्क बनले आहे. ११ उत्पादन-आधारित उद्योगांच्या अभ्यासानुसार दक्षिण कोरियाचा इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग हा दुस मोठ्या क्रमांकाचा प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर कॅफे कॉफी डे (सीसीडी), डोमिनोस इंडिया आणि बाटा यांनी प्रथम पाच स्थान मिळवले आहेत.















































