‘या’ कारणामुळे सलमान सोडतोय बिग बॉस..!

मुंबई: सलमान सध्या ‘ट्रिजेमिनल न्‍यूरेलजिया’ या आजाराचा सामना करत आहे. त्यामुळे “बिग बॉस” हा शो तो करणार नसल्याचे समजते आहे.
बिग बॉसचे जवळपास १० सीझन होस्ट करणारा सलमान खान या शोचा एक महत्त्वाचा भाग झाला होता.
काही दिवसांपूर्वीच या शोच्या मेकर्सनी यंदाच्या सीझनचा कालावधी वाढवला असून हा शो आणखी ५ आठवडे चालणार आहे. दरम्यान उर्वरित एपिसोडचे होस्टिंग फराह खान करणार असल्याची माहिती आहे.
सलमान ‘ट्रिजेमिनल न्‍यूरेलजिया’ या आजाराचा सामना करत असल्याने त्याने जास्त ताण घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
मागच्या काही आठवड्यांपासून ‘विकेंड का वार’ मध्ये सलमान नेहमीच तणावाखाली असलेला दिसला आहे. त्यामुळे सलमानचे कुटुंबीय सुद्धा चिंतेत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा