यशस्वी नृत्य दिगदर्शिका फराह खान

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकांपैकी एक, तसेच चित्रपट निर्माता फराह खानला आज कोण ओळखत नाही असे नाही. आज तिचे यश बोलते असले तरी तिला यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे.
तिचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. तिला सर्व सुखसोई उपलब्ध होत्या. मात्र एका घटनेने तिचे अख्खे आयुष्य बदलले. यानंतर तिने अनेक चढउतार पाहत संकटाना धैर्याने तोंड दिले. तिचा हाच प्रवास आज थोडक्यात जाणून घेऊयात.

लोकप्रिय स्टंटमॅन व निर्माता कामरान खान यांची ती मुलगी. फराह सांगते की, ‘मी व माझा भाऊ साजिद आम्ही पाच वर्षांच्या वयातपर्यंतच बॉलिवूडचा सर्वोत्तम काळ पाहिला.
मात्र एकेकाळी कामरान खान यांना त्यांच्या नशिबाने फसवले. १९७१ मध्ये त्यांचा प्रदर्शित झालेला ‘ऐसा भी होता है’ हा चित्रपट फ्लॉप झाला. यावेळी त्यांनी आपले सर्व भांडवल या चित्रपटासाठी खर्च केले होते. मात्र त्यांच्या हातात काहीच आले नाही व तेथूनच फराह कुटुंबाचा वाईट काळ सुरू झाला.
फराह सांगते, की वडिलांच्या मृत्यूवेळी खिशात अवघे ३० रुपये होते. वेळप्रसंगी वडिलांच्या अंतिम संस्कार करण्यासाठी तिला आजूबाजूच्या लोकांना मदत करण्यास सांगावे लागले. पुढे डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी फराहकडे पुरेसे पैसे नव्हते. मग ती स्वत: नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन शिकली. तिला कोणत्याही प्रकारचा नृत्य अधिकृतपणे शिकता आला नाही याची आजही खंत आहे.
त्यावेळी फराहने मन्सूर अली खान यांना सहाय्यक म्हणून ठेवण्याची विनंती केली. त्याचवेळी सरोज खान ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटात नृत्यदिग्दर्शनासाठी न आल्याने फराहला संधी मिळाली.
फराहला केवळ एका संधीचा उशीर होता आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. फराहने ‘ढोल बजने लगे’ (विरासत), ‘छैंया-छैंया’ (दिल से), ‘एक पल का जीना’ (कहो ना प्यार है), ‘मुन्नी बदनाम हुई’ (दबंग) अशा अनेक ब्लॉकबस्टर गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे.
आज फराह एक यशस्वी नृत्य दिग्दर्शक म्हणून गणली जाते. शिवाय फराहने ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ व ‘हॅपी न्यू इयर’ सारखे चित्रपट केले. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले.
फराह ‘तेरे मेरे बीच में’, इंडियन आयडॉल सीझन १,२ ‘जो जीता वही सुपरस्टार’, ‘एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा’, ‘डांस इंडिया डांस’, ‘लिटिल मास्‍टर्स’ आणि ‘जस्ट डान्स’ या शोमध्ये जज म्हणून दिसली.
फराहने तिच्याच चित्रपटाचे एडिटर शिरीष कुंदर यांच्यासोबत आपल्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात केली. दोघांचे लग्न झाले. तिला ३ मुलं असून आज ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा