१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली होती. आजच्याच दिवशी १ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांची निवड करण्यात आली होती. पुढे मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राचे निर्माण झाले त्यावेळीही यशवंतराव चव्हाण यांची पाहिले मुख्यमंत्री म्हणून १ मे १९६० रोजी निवड करण्यात आली होती.
तरुण नेत्यांची आजची फळी त्यांच्याच विचारसरणीने महाराष्ट्राला पुढे नेत आहे. महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून रूपाला आणणाऱ्या चव्हाण साहेबांनी देशाच्या सेवेत महाराष्ट्र कुठेही कमी पडू दिला नाही. राष्ट्राच्या सेवेत मराठी माणसाचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल हे कृतीतून दाखवून दिले आहे. महाराष्ट्राला यशवंत आणि देशाला किर्तीवंत केले आहे.