कोरोनामुळे नाशिकमधील सप्तशृंग देवीची यात्रा रद्द

नाशिक, १० ऑक्टोबर २०२० : देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धं पीठ मानल्या जाणाऱ्या, नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीची नवरात्राच्या निमित्तानं भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासन आणि देवस्थानच्या बैठकीत हा निर्णय झाला.

दरवर्षी यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. गडावर यंदा नवरात्र कालावधीत पुजारी आणि सेवेकरी यांनाच प्रवेश असेल, तसंच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कावडधारकांना आणि ज्योत नेणा-यांना बंदी असेल.

कोजागिरीच्या दिवशी गडावर तृतीय पंथीयांची यात्रा भरते, मात्र यंदा ती देखील रद्द केली आहे. नवरात्र आणि नंतरही देवीचं ऑनलाईन दर्शन सुरू करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा