येडगाव वसाहतीत मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

नारायणगाव : आपल्या अवती-भवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्नेहमेळावे घेतले जातात. परंतु ज्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आणि अनेक वर्षे वास्तव्य केलेली कुटुंबे एकत्र राहतात. हे फक्त कुठल्या चाळीत अथवा एखाद्या सरकारी वसाहतीमध्ये पहायला मिळते.
अशीच एक जुन्नर तालुक्यातील येडगाव कॉलनी (वसाहत). येथे सवर्धर्मसमभाव असणारी अनेक कुटुंबे राहतात. जी ना कुणाच्या नात्यातील आहे ना कुणाच्या जवळची. परंतु तरीही एका कुटुंबाप्रमाणे राहतात. हे फार दुर्मिळ ठिकाणी पहायला मिळते. परंतु जेव्हा ही कुटुंब ३० ते ३२ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर जो आनंद होतो तो गगनात न मावणारा असतो. अशाच एका आगळ्या वेगळ्या “आजी माजी रहिवाशी” मेळाव्याचे आयोजन येडगाव वसाहतीत करण्यात आले होते.

या मेळाव्यात जवळपास ६० हुन अधिक कुटुंबाने हजेरी लावली होती. आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद यांसह आदी लांबच्या ठिकाणाहून नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
त्यात प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाविषयी असलेली माहिती देण्यात आली. यावेळी सर्वांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच ज्या व्यक्तींनी या ठिकाणी आपले आयुष्य घालवले अशा व्यक्तींनी आपल्या मनातील भावना सांगताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. अनेकांनी आपल्या सुख दुःख मांडण्याचा यावेळी प्रयत्न केला. यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी रज्जाक शेख, बाळासाहेब मिंडे, डॉ.विजय पालवे, नितीन पालवे, सचिन पालवे, संतोष शिंदे, रियाज रजपूत, बेराज रजपूत, हभप रामदास मोरे, दिलीप मुळे, दत्तात्रय थिटे, विठ्ठल मिंडे या धडाडीच्या तरुण नेतृत्वानी मोलाचे सहकार्य केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा