मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यात यलो अलर्ट, २९-३० जूनला ‘मोठा पाऊस’

मुंबई २८ जून २०२३: देशाची राजधानी दिल्लीसह बहुतांश राज्यांत मान्सूनने जोरदार हजेरी लावलीय. त्याचवेळी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

मान्सून आता महाराष्ट्रात सर्वत्र दाखल झाला असुन गेल्या ४८ तासांत पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. आता हवामान खात्याने मुंबई, पुण्यासारख्या महाराष्ट्रातील मोठ्या राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. येत्या २९ आणि ३० जून रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारपर्यंत एकट्या मुंबई शहरात १०४ मिमी पाऊस पडला, तर पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे १२३ मिमी आणि १३९ मिमी पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्यानंतर मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आयएमडी ने आता नव्याने मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा