येस बँक लवकरच भांडवल उभारणार: रवनीत गिल

29

मुंबईः येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवनीत गिल यांनी भांडवल उभारण्याचा प्रयत्न करीत मंगळवारी सांगितले की बँक भांडवल उभे करणार आहे. आपण योग्य दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “बँकेमध्ये भांडवल येताच बँकेची वाढ अमर्याद स्वरुपात होऊ शकते.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही मोठ्या प्रमाणावर भांडवल गोळा करत आहोत यामध्ये कोणतीही शंका नाही तसेच बँकेमध्ये भांडवल येताच बँक पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल.”
अलीकडेच काही बँकर्स म्हणाले होते की येस बँक विकत घेण्यासाठी कोटक महिंद्रा बँक सर्वात योग्य आहे. गिल यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना या गोष्टी रिकाम्या अफवा म्हणून घोषित केल्या. येस बँक भांडवल उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात येस बँकेने लंडनच्या सिटॅक्स होल्डिंग्ज आणि सीताॅक्स इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या ५० दशलक्ष डॉलर्सच्या बोलीवर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मंडळाच्या पुढील बैठकीत प्रस्तावित प्राधान्य समभागांसाठीचे वाटप व बोली यावर पुन्हा चर्चा होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा