मुंबई, २६ एप्रिल २०२३: नाणारमधील रिफायनरीला लोकांचा विरोध होता, म्हणून उद्धव ठाकरेंनी बारसूची जागा सुचवली होती. पत्र ठाकरेंनीच लिहिलं होतं, पण शिवसेना रिफायनरी विरोधकांच्या पाठीशी आहे. असं उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक लोकांशी चर्चा करावी, असंही राऊत यांनी म्हटलंय.
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्थापित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचं काम मंगळवारी दुपारपासून सुरू करण्यात आलं. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी बारसू येथील शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन केलं. हा प्रकल्प उभारणारच असा निश्चय सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. विरोधक मात्र लोकभावनेच्या बाजुने असल्याचे सांगत सरकारवर हल्लाबोल करत आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सूचवली होती. पण शिवसेना लोकभावनेच्या बाजुने आहे. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. उद्योग जगला तर कामगार जगेल, उदय सामंत यांनी स्थानिक लोकांसोबत चर्चा करावी, असं राऊत यांनी म्हटलंय. राणेंनी कोणते प्रकल्प कोकणात आणले ? फॉक्सकॉन प्रकल्प का गेला ते आधी सांगा? असे सवालही राऊत यांनी केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर