मुंबई, २६ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित आता समोर आलेली आकडेवारी भयावह आहे. शनिवारीही राज्यात कोरोनामुळं २ मृत्यू झाले असून ४३७ कोविड रुग्ण आढळले आहेत. एका आठवड्यात दररोज १००-१५० कोरोना रुग्णांची संख्या ४५० च्या जवळ पोहोचलीय. अशा प्रकारे अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्र दररोज ५०० चा आकडा गाठेल. महाराष्ट्र हे देशातील अशा तीन राज्यांपैकी एक आहे जिथं कोरोना पॉझिटिव्ह दर ८ टक्क्यांच्या वर आहे. याचा अर्थ एवढाच की आता दररोज आकडे त्याच वेगाने वाढतील.
शुक्रवारी कोरोनामुळं ३ मृत्यू झाले असून ३४३ रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच एका दिवसात सुमारे शंभर केसेस वाढल्या. ही देखील चिंतेची बाब आहे की पुन्हा एकदा अधिक नवीन रुग्ण येत आहेत आणि त्या तुलनेत रुग्ण बरे होऊन कमी संख्येने घरी जात आहेत. शनिवारी तीनशे त्रेचाळीस नवीन रुग्ण आढळले, तर केवळ २४२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले. आतापर्यंत ७,९९,१६६ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.
कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या दुहेरी हल्ल्यामुळं वाढती चिंता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांसाठी एक सल्लागार जारी केलाय. कोरोना विषाणूची वाढती प्रकरणं लक्षात घेऊन १० आणि ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येत आहे. या मॉक ड्रीलमध्ये येणारे धोके लक्षात घेता, आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणं, ऑक्सिजन इत्यादींची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल आणि कोरोना आणि इन्फ्लूएंझाला तोंड देण्यासाठी उर्वरित तयारीचाही आढावा घेतला जाईल. देशात कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत १५९० नवे रुग्ण समोर आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड