मुंबई, २७ ऑगस्ट २०२१: राज्यात करोनाची लाट ओसरत असताना गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. काल दिवसभरात ५ हजार १०८ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त १३,०८५ अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात काल १५९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. तब्बल २८ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५० हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १३,०८५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील एकूण १७ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. जळगाव ४०), नंदूरबार (१), धुळे (१६), जालना (८५), परभणी (२१), हिंगोली (६०), नांदेड (३४), अमरावती (९४), अकोला (२०), वाशिम (०२), बुलढाणा (३९), यवतमाळ (०१), नागपूर (७७), वर्धा (५), भंडारा (९), गोंदिया (३), गडचिरोली (२९) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे